वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भरधाव वेगाने साताऱ्याहून वाईकडे येणाऱ्या मोटारीने साताराकडे जाणाऱ्या दुचाकीला बावधन ओढा (ता वाई) परिसरात जोरदार धडक दिली.या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. मोटार चालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून जखमींना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघाताचे क्षण कमेऱ्यात कैद झाली आहेत. वनिता प्रवीण भोसले(वय ३५ ,केसरकर पेठ सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटार चालकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की फिर्यादी वनिता ह्या पती प्रवीण यांचेसोबत दुचाकीवरून रविवारी दुपारी वाईला किसन वीर महाविद्यालयात पुस्तके आणण्यासाठी गेले होते. तेथील काम झाल्याने दोघेही सातारच्या दिशेने परत निघाले होते.प्रवीण हे गाडी चालवत होते. यावेळी बावधन ओढ्यानजीक दोन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडून वाईकडे येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात वनिता व प्रवीण हे दोघेही दुचाकीवरून लांब फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून वनिता या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत.त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान,मोटार चालक राजेंद्र रामचंद्र रसाळ(रा.सहयाद्रीनगर) याच्यावर वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुभाष धुळे हे तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.