सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या मी तयार आहे, पण चर्चेला याल तर धाडस ठेवा, असे आव्हानं’ खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले.
सातारा पालिकेची नूतन प्रशासकीय इमारती जिल्हा परिषदेमोरील कॅम्प सदरबझार येथे उभी राहत आहे. या इमारतीचे भूमीपूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक किशोर शिंदे, वसंत लेवे, राजू भोसले, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, सुहास राजेशिर्के, सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा रंजना रावत आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, ‘कोण काय म्हणतंय याच्याशी मला काहीच घेणं नाही. सातारकरांच्या पाठबळावर मी ठाम असून भविष्यातही मी आपल्या सेवेत रुजू आहे. सातारकर माझं हृदय आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आजवर जर मी काही कमवलं असेल तर ते पैसे नाही तर तुमचं प्रेम आहे. ते मी गमावणार नाही. टीका करणारे करतील पण जे काम करतात तेच नारळं फोडतात.
You must be logged in to post a comment.