डॉ. नागनाथ अण्णा नायकवडींच्या रचनात्मक कार्यातून प्रेरणा घेऊन काम करीत राहणे ही त्यांना श्रध्दांजली : वैभवकाका नायकवडी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ब्रिटिश सरकारच्या काळात अनेकांनी बलिदान दिले, तुरुंगवास भोगला आणि त्यांच्या त्यागामुळे आज आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सातारचे प्रतिसरकार सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला आहे. या लढ्यात अग्रभागी असलेल्या डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी स्वातंत्र्यापूर्व काळात संघर्षात्मक तर स्वातंत्र्यानंतर रचनात्मक काम उभे करण्याचे मोलाचे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना स्मृती जागृत ठेवून स्वातंत्र्याचे सूराज्य निर्माण करण्यासाठी डॉ. नागनाथ अण्णा नायकवडींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी केले.

पद्मभूषण, क्रांतिवीर, डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी यांनी धुळे खजिना लूट, शेणोली पे ट्रेन लूट अशा अनेक क्रांतिकारी चळवळीतून इंग्रजांना सळोकी पळो करून सोडले होते. म्हणून त्यांना अटक करून सातारा येथील जिल्हा कारागृहात डांबून ठेवले होते. तेथून बाहेर पडण्याच्या उद्देशाने नागनाथअण्णांनी १० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा जेल फोडून पळाले होते. या अतुलनिय शोर्याच्या स्मृति म्हणून सातारा येथे साजऱ्या होणाऱ्या ७८ व्या ‘शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी सातारा कारागृह उपअधीक्षक शामकांत शेडगे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डाॅ. शिवलिंग मेनकुदळे, हुतात्मा दूध संघाचे व्हाईस चेअरमन भगवान पाटील, शिराळा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब नायकवडी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले, शौर्य दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी असलेल्या क्रातिवीर नायकवडींचे हे विचार आजच्या नविन पिढीपर्यंत पोहोचावेत व या विचारांतून प्रेरणा घेवून नवीन भारत उदयाला यावा.

कारागृह उपअधीक्षक मेनकुंदळे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी केलेल्या त्यागामुळे आज कायदेचे राज्य निर्माण झाले आहे. या अशा क्रांतिवीरांचे जीवनाची प्रेरणा घेऊन विधायक काम हाती घेऊन राष्ट्र घडविण्यासाठी कार्य करणे ही या स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली असणार आहे.

बाळासाहेब नायकवडी म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा, क्रांतिअग्रणी जी.डी बापू लाड यांच्या कार्याचे आणि विचारांचे आपण वारसदार आहोत. या विचारांवर निष्ठा ठेवून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे म्हणता येईल.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. तर आभार गणेश दुबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला श्रमिक मुक्ती दलाचे नेते चैतन्य दळवी, अॅड राजेंद्र गलांडे, यत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच सांगली , सातारा , कोल्हापूर येथील क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या विचारांचे कार्यकर्ते तसेच हुतात्मा संकुलातील शिक्षक ,सर्व संस्थांचे पदाधिकारी , कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!