सातारा जिल्हा पोलीस दलाला बेस्ट पोलिसिंगचा अवाॅर्ड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पोलीस महासंचालकांकडून सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव करण्यात आला असून बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग सन्मानित करण्यात आले आहे. सातारा पोलीस दलाचा राज्यात यामुळे नाव लाैकिक झाला असून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस व पोलीस ठाण्याची पायरी म्हटले की आजही भल्याभल्यांची भंबेरी उडते. पोलीस नीट बोलत नाहीत. पोलिसांशी बोलायला नकोच. एखादी महत्त्वाची माहिती असेल तर आपण स्वतः सांगून तर कशाला अडकायचे, असे गैरसमज आजही लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांचे आहेत. पोलिसाबाबतचा हा चुकीचा गैरसमज दूर करण्यासाठी सातारा पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा जवळचा मित्र वाटला पाहिजे. यालाच कम्युनिटी पोलिसिंग म्हणून ओळखले जाते. ही संकल्पना राबविताना व प्रत्यक्षात साकारताना सातारा पोलिसांनी अनेक उपक्रम राबवले. यातूनच पोलीस व सर्वसामान्य यांचे घट्ट नाते झाले.

बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग सोबतच सीसीटीएनएस यासह विविध तंत्रज्ञानाचा रास्त वापर व गुन्ह्यांचा छडा यामध्ये सातारा पोलीस दलाला यश आले असून त्याबद्दल राज्य शासनाने दखल घेऊन सातारा पोलिसांचा गौरव केला आहे.

error: Content is protected !!