सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राजकीयदृष्ट्या महत्वाची ओळखल्या जाणाऱ्या भरतगाववाडी (ता.सातारा) येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली.खा.उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या तसेच माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर,माजी उपसरपंच यशवंत ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
सोसायटीच्या चेअरमनपदी आनंदराव बर्गे तर व्हा.चेअरमनपदी अशोक जगताप यांची निवड करण्यात आली.
सोसायटीच्या संचालकपदी यशवंत ढाणे,सूर्यकांत काटकर,प्रल्हाद गुलगे,तानाजी पवार,सतीश घाडगे, बाबू पडवळ,मोहन सुतार, बाळकृष्ण खवळे,सौ, सुधा घाडगे,श्रीमती शकुंतला शिंदे यांची निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीत सुनील काटकर म्हणाले की भरतगाववाडी गाव नेहमीच विकासकामांत अग्रेसर राहिले आहे.निवडणूकांच्या माध्यमातून होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी येथील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच एकत्र येत बिनविरोधचा चांगला पायंडा पाडला आहे.
सोसायटीची ही सलग चौथी पंचवार्षिक बिनविरोध झाली असून येथील ग्रामपंचायतही सार्वमत घेऊन बिनविरोधच केली जात आहे.त्यामुळे गावात आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा तंटा झाला नाही.सोसायटीच्या प्रगतीचा आलेखही यामुळे उंचावणार आहे.
बैठकीस सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ,साहेबराव पवार,सरपंच दीपक शिंदे,उपसरपंच संपत मोहिते,सदस्य पोपटराव पडवळ,प्रदीप काटकर,बबनराव चव्हाण,शरद इंगळे,जालिंदर चव्हाण,विश्वासराव फडतरे, सुभेदार विलासराव घाडगे,जयवंतराव बागल,माधव पवार, नितीन पडवळ,माजी चेअरमन कृष्णत इंगळे,चंद्रकांत काटकर,कृष्णत बर्गे, किशोर चव्हाण,तेजस जगताप,अंकुश कणसे,सोसायटी सचिव शंकर पडवळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व नूतन संचालक मंडळाचे खा.उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.