सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्री.छ. शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधी जीर्णेाध्दारास शाहुनगरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ.वृषालीराजे भोसले यांनी दिली.
त्या तारळे(ता.पाटण) येथील भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधीस सदिच्छा भेट दिल्यानंतर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, भवानीबाई यांचे लग्न हरजीराजे महाडिक व अंबिकाबाई यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी झाले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता. सा-या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशावेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक यांना चार हजारी मनसबदार करुन ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना 24 गावांची सनद त्यांच्या नावे करुन दिली. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या. मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहात 1 जुलै 1710 मध्ये भवानीबाईंनी परत उभी केली. शंकराजी महाडिक यांचे सुमारे 1728 च्या दरम्यान निधन झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी भवानीबाई सती गेल्या.
राजे महाडिक घराण्याच्या खासगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर समाधी आहे. या समाधीस शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ.वृषालीराजे भोसले आणि पदाधिका-यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या पाऊलखुणा, दस्तऐवज, उपलब्ध असलेले पत्रव्यवहार, महाडिक यांच्या वंशजाचे वाडे यांना भेट देऊन समाधीच्या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी भानजी राजेमहाडिक, भाऊसाहेब राजेमहाडिक, कृष्णराजे राजेमहाडिक, शिवसिंग राजेमहाडिक, निलेश राजेमहाडिक, संदीप राजेमहाडिक, सौ. राजश्री राजेमहाडिक, स्नेहल राजेशिर्के, रेणुका राजेशिर्के, ज्योती राजेमहाडिक, सुशांत मोरे, निलेश झोरे, विक्रम क्षीरसागर, राजेमहाडिक परिवार उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.