सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील तमाम आंबेडकरीप्रेमींसाठी शौर्यदिनानिमित्त भीमा-कोरेगाव येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी व कोविड हद्दपार करण्यासाठी साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. हा स्तंभ अभिवादनासाठीदि. १ जानेवारी रोजी शाहू चौकातील महामानवाच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात येणार आहे.
दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, आंबेडकरी अनुयायांनी शासनास सहकार्य करून मुंबईतील गर्दी टाळली त्याच प्रमाणे भीमा कोरेगाव येथील गर्दी टाळून कोवीडला हद्दपार करण्यास शासनाला प्रतिसाद द्यायचा आहे. सातारमध्ये अभिवादनाच्या वेळी सोशल डिस्टन्स, मास्क, सँनीटाझर याचा वापर करण्यात येणार आहे.
आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहात. त्यामुळे सर्वांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे न जाता साताऱ्यात मध्येच अभिवादन करावे. माझा समाज, माझी जबाबदारी अभिवादनास येताना मास्क हे जरूरी आहे. प्रतिकृती करण्यासाठी श्री समर्थ इंटरप्राईजेस विकास नगर सातारा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्ल्यू फोर्स जिल्हाअध्यक्ष किरण ओव्हाळ, युवक उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, दीपक नलावडे, जयवंत कांबळे, माणिक आव्हाड, दिपक गाडे, शेखर आडागळे, किशोर डेंगळे, यशवंत ओव्हाळ, वैभव शिंदे, प्रतीक गंगावणे, विनोद देखणे, बाबा ओव्हाळ, सुनिल ओहाळ, राजू आव्हाळ इत्यादी परिश्रम घेत आहेत.
You must be logged in to post a comment.