सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांना २२ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आज (सोमवार) त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत. या आंदोलनास रयत क्रांती संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.
वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा होऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या बावीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
त्यामुळे कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सुमारे ४०० कामगार सहभागी झाले आहेत. या आंदोलनास रयत क्रांती संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या पाठिंब्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे व कार्यकर्त्यांनी दिले.
You must be logged in to post a comment.