भुईंज कारखान्याची निवडणूक जाहीर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसन वीर साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या सोमवार (ता. २८) पासून अर्ज दाखल करता येणार आहेत. तीन मे रोजी मतदान होणार असून, ५ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळ तसेच आमदार मकरंद पाटील यांचे पॅनेल असणार का, याची उत्सुकता आहे.

भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. तरीही सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील महिन्यात कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. त्यातच सध्या कामगारांनी आपला थकीत पगार मिळावा म्हणून आंदोलन केले होते. कारखान्याच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी निवडणूक कार्यक्रम अंतिम केलाय.

error: Content is protected !!