‘भूमिशिल्प’ च्या वेबसाईटचे उद्घाटन

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेली अडीच-तीन महिन्यांपासून कोरोना संदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक घटना आणि माहिती देणार्‍या ’भूमिशिल्प’च्या वेबसाईटचे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. 
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी कोणत्याही क्षेत्रातली बातमी असो, ती वाचकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचवण्याचे काम करणार्‍या ’भूमिशिल्प’ने अल्पावधीतच सातारकर वाचकांची मने जिंकली आहेत. भूमिशिल्प साप्ताहिकाने आपला वाचकवर्ग जपला असतानाच गेली अडीच-तीन महिन्यांपासून रोजच्या रोज प्रसिद्ध होणार्‍या भूमिशिल्प डिजिटल पेपरनेही आपलं वेगळेपण जपत वाचनीय परंपरा कायम राखण्यात यश मिळवले आहे. 
’भूमिशिल्प’ने या कोरोनासंकट काळात डॉक्टर, नर्सेस, पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्या कार्याची वेळोवेळी दखल घेतानाच रिक्षावाले काका, पोस्टमन, सलूनधारक आदी वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडून आपले सामाजिक भान जपले आहे. 
’भूमिशिल्प’च्या वेबसाईटचे उद्घाटन झाल्याने सातारकरांना वाचनासाठी तो चोवीस तास उपलब्ध होणार आहे. कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या अध्यक्षा कोमल पवार-गोडसे आणि धीरज गोडसे यांच्या स्वगृही तसेच कला, वाणिज्य कॉलेजच्या हॉलमध्ये www.Bhumishilp.com या वेबसाईटचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ’भूमिशिल्प’चे संपादक पद्माकर सोळवंडे यांच्यासह श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, जयेंद्र चव्हाण, शेखर घोडके, वसंत जोशी, श्रेणीक शहा, अजय देवी, मनोज देशमुख, यशवंत गायकवाड, अमित बोटे, पत्रकार सनी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


error: Content is protected !!