भूसंपादन अधिकार्‍यांच्या कारभाराची चौकशी व्हावी : महारुद्र तिकुंडे

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील भूसंपादन अधिकारी मंजूषा रामचंद्र मिसरकर यांच्या भ्रष्ट कारभाराची व चल अचल मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे

पोलिस उपअधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, सातारा यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सातारा येथील भूसंपादन अधिकारी मंजूषा मिसरकर यांची औरंगाबाद विभागात अंबेजोगाई, ता. बीड येथे रिक्त पदावर पदोन्नतीचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. असे असताना त्यांनी तत्कालीन ठिकाणी असणार्‍या संपादन प्रक्रियेमधील लाभापोटी पदोन्नतीचे पद व पदभार स्वीकारला नाही. सध्या भूसंपादन क्र. 16 मध्ये मोठ्या प्रमाणावर भूसंपादन प्रक्रियेचे काम चाललेले आहे. त्यामुळे त्याठिकाणी अर्थकारण करण्याच्या विचाराने मंजूषा मिसरकर गैरवापर करीत आहेत.
त्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट मार्गाने आर्थिक चल अचल मालमत्ता गोळा करीत आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी योग्य ती कारवाई आपल्या कार्यालयाकडून करण्यात यावी. त्याचबरोबर अधिकार्‍यांची  व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. 
error: Content is protected !!