सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच विविध सामाजिक प्रश्न हाताळून समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली . पुरोगामी महाराष्ट्राची मुहुर्तमेढ त्यांनीच रोवली. सावित्रीमाईंचे चरित्र घराघरात पोहचविणे गरजेचे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाईंचा जन्मदिन सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानुसार सर्वत्र हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पण त्याला अपवाद सातारा नगरपरिषद होती. पालिकेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादनाचा कार्यक्रम झाला. पण त्यास महिला पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी होती.
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील नायगाव ता . खंडाळा येथे झाला. त्यामुळे दरवर्षी शासकीय कार्यक्रम नायगाव येथे झाला. या कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील , गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , आमदार मकरंद पाटील , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते , बापूसाहेब भुजबळ, सभापती राजेंद्र तांबे, तसेच जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनुयायांनी दिवसभर गर्दी केली होती.
दुसरीकडे मात्र, सातारा नगरपालिकेत सत्ताधारी गटाकडून या जयंतीबाबत अनास्था दिसून आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सातारा नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे, भांडार प्रमुख देविदास चव्हाण, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन अध्यक्ष गणेश दुबळे, स्वीय सहाय्यक अतुल दिसले, अमोल लाड, महिला कर्मचारी सावंत व सोनटक्के उपस्थित होत्या. मात्र, या कार्यक्रमास महिला पदाधिकारी गैरहजर होते. त्यामुळे साताऱ्यातील फुले अनुयायांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
You must be logged in to post a comment.