सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता भाजपच्या ओबीसी आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज राज्यभर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे. तर राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली आहे.
भाजपच्या वतीने ठाकरे सरकारच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. साताऱ्यातही भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी नंदकुमार यादव, नगरसेवक विजय काटवटे, शेखऱ लोखंडे, करण पोरे, तानाजी चव्हाण, अमोल भुजबळ, भारत जंत्रे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ‘आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
You must be logged in to post a comment.