सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळाल आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने साताऱ्यात बाॅम्बे रेस्टाॅरंन्ट चौकात चक्का जाम आंदोलन केलं.
पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीने आत्महत्या करुन आज वीस दिवस झाले तरीही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे या तपासात अडचणी येत आहेत असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
संजय राठोड यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. एखादा हिरो ज्या पद्धतीने वावरतो त्या प्रमाणे संजय राठोड मंदिरात जात आहेत, शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरु असल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे. संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी सातारा भाजप महिला मोर्चाने आंदोलन केलं. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या. या आंदोलनाच्यावेळी महिलांनी राज्य सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. या दरम्यान मोठा गोंधळ उडाला होता, त्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिले.
यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्षव राजेंद्र इंगळे, उपाध्यक्षा स्मिता निकम, हेमांगी जोशी, अश्विनी हुबळीकर, वैष्णवी कदम, नेहा खैर, निर्मला पाटील, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, गणेश पालखे, राहुल शिवनामे, शैलेंद्र कांबळे, विक्रम बोराटे, उत्कर्ष रेपाळ, सचिन साळुंखे व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.