सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे नेते आमदार आशिष शेलार संघटनात्मक आढावा घेण्यासासंदर्भात सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी सुरुची निवासस्थानी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट दिली. यावेळी विक्रम पावस्कर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्हानिहाय तयारी सुरु केली आहे. त्यानुसार जिल्हा भाजपने बूथनिहाय रचना तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा आढावा आमदार आशिष शेलार यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, भाजपचे दोन आमदार व दोन खासदारांच्या माध्यमातून ताकद निर्माण करण्यासाठी तयारी भाजपची आहे. त्यानुसार भाजपने बूथनिहाय बांधणी सुरू केली आहे.
सातारा शहरानंतर आशिष शेलार यांनी कराड शहरातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. यावेळी आमदार जयकुमार गोरे, अतुल भोसले, शेखर चरेगावकर आदी नेते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.