सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली आहे. सातारा शहरातील सर्व 131 बुथवर बूथ कमिटी पूर्ण आहेत त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे सातारा नगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने लढेल, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला.
भाजप सातारा शहर वाॅर्ड प्रभारींची बैठक सातारा शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित कुलकर्णी, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेट्टी, शहराध्यक्ष विकास गोसावी व भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते
यावेळी अमित कुलकर्णी यांनी सातारा शहरातील कार्यकर्ते चांगले काम करत असून भाजपाचे कमळ हे चिन्ह घराघरात पोहचवण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले. सर्वांनी मिळून काम केले तर आपल्याला अवघड काहीच नाही फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत तिकीट मिळाले नाही तर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे.
यावेळी दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे , सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहरचे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, वैशाली टंकसाळे, चिटणीस रवी आपटे, नजमा बागवान, आघाड्या, मोर्चाचे अध्यक्ष, पदाधिकारी व वॉर्ड प्रभारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.