सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे नवाब मलिक यांचा काळे फासून निषेध केला.
१९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे आंदोलन केले. नवाब मलिक ,महाविकास आघाडी राज्य सरकार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आणि नवाब मलिक यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे ,ऍड प्रशांत खामकर, सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले ,जयदीप ठुसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे ,शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार, चिटणीस रवि आपटे ,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोगावले, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.