राणे यांच्यावरील कारवाईचा भाजपकडून निषेध

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय जनता पार्टी सातारा तर्फे केंद्रीय नारायण राणे यांना अटक केल्याप्रकरणी राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला, त्यासंबंधीचे निवेदन भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हणाले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने अटक केली असून सदर अटक ही पूर्णपणे राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे.

भाजपाच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे अगोदरच दोन ते तीन दिवस जनादेश यात्रेच्या विरुद्ध मुंबईमध्ये ४० च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले.

error: Content is protected !!