साताऱ्यात भाजपाचे नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा साताऱ्यात भाजपाच्यावतीने नानांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी भा ज पा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले.

यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार ,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा चिटणीस विजय गाढवे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष अप्पा कदम,सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके,वैशाली टंकसाळे, प्रशांत जोशी,चिटणीस रवी आपटे,महिला मोर्च्या शहराध्यक्ष रीना भणगे, तालुकाध्यक्ष मोनाली पवार, ओ बी सी युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, शहराध्यक्ष मनीषा जाधव, युवा मोर्च्या शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, जेष्ठ नागरिक अध्यक्ष प्रकाशकाका शहाणे, ओ बी सी शहर उपाध्यक्ष अविनाश खार्शिकर, किरण माने , पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!