सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे (वय १००) यांचे कराड येथे आज वृद्धपकाळाने निधन झाले.
नगरसेवक, भाजपचे संघटक म्हणून राजाभाऊ यांचा पक्षात दरारा होता. त्यांनी वयाची शंभरी पार केल्याबद्दल देशपांडे यांचा केंद्रीय अवजड रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी २६ सप्टेंबर रोजी सत्कार केला होता. गडकरी यांच्या हस्ते पेढ्यांचा हार घालून देशपांडे यांचा सन्मान केला होता.
देशपांडे १९९० च्या दशकातील आक्रमक नेते म्हणून जिल्ह्याला परिचीत होते. आक्रमक नगरसेवक म्हणूनही त्यांनी १९९० चा कालवधी पालिकेत गाजवला होता. पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कालवधीत ते आक्रमक विरोधी नगरसेवकाच्या भुमिकेत सातत्याने चर्चेत राहिले होते. मात्र अलीकडे अनेक वर्षापासून श्री. देशपांडे राजकारणापासून अलिप्त राहिले होते.
You must be logged in to post a comment.