पाटण,(भूमिशिल्प वृत्तसेवा): भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल बेताल आणि अशोभनीय वक्तव्य केले. पत्रकारांची खिल्ली उडवली. अशा बेताल आणि उन्माद बावनकुळेला पाटण तालुका पत्रकार संघाकडून ५२ वेळा चप्पलचे फटके मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा समन्वयक शंकरराव मोहिते, महिला आघाडी राज्य सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर, जेष्ठ पत्रकार जालिंदर सत्रे, शहर प्रमुख सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष संजय कांबळे, पत्रकार राम पाटील, प्रविण जाधव यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
आपल्या विषयी चांगले लिहून आले की पत्रकार चांगले व चुकींच्या गोष्टींवर बोट ठेवले की पत्रकार वाईट ही संकल्पना सध्या रुजू पहात आहे. यामुळे पत्रकारांच्या लेखन स्वांतत्र्यावर घाला घालण्याचे काम होत असून यामध्ये समाजाच्या भल्यासाठी काम करत असलेल्या पत्रकारांना अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो. राजकीय मंडळींनी कधीतरी आत्मचिंतन करावे व गेंड्याची कातडी बाजूला करुन संवेदनशील मनाने खरंच आपण समाजाच्या सेवेसाठी राजकारण करत आहोत का याचा विचार करावा, असे परखड बोल पत्रकार राम पाटील यांनी यावेळी सुनावले.
दरम्यान ,या उन्माद प्रदेशाध्यक्षाने पत्रकारांविषयी बेताल वक्तव्य केले म्हणून पाटण मधील मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक यशवंतराव जगताप, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, तालुकाउपाध्यक्ष संजय सत्रे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विक्रम यादव, समाजसेवक नितीन कांबळे, शंकर कांबळे उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.