भाजप प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते जायंट किलर रांजणे यांचा सत्कार


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला यानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज आंबेघर येथे रांजणे यांचा सत्कार केला.

पाटील म्हणाले, संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्वपूर्ण आहे. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी आज इथं आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतलं जाईल असे सांगितले.

आंबेघर येथे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल देशपांडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जिल्हा बँकेवर जावळी सोसायटीच्या हाय होल्टेज लढतीत ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम आलो आहे. सामान्य कुटुंबातील रांजणे यांचा विजय हा महत्वपूर्ण असल्याने त्यांचा सत्कार भाजपच्या वतीने आज करण्यात आला.

error: Content is protected !!