भाजपचे शंखनाद आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सातारा शहर व परिसरात मंदिर उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले.

भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे व शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दत्त मंदिर, नटराज मंदिर बॉम्बे रेस्टॉरंट चौक व साईबाबा मंदीर गोडोली आदी ठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

राज्यातील धार्मिक स्थळे, देवी-देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणारे ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला, शंखनाद व घंटानाद करून मंदिर परिसर दुमदुमून सोडला ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. सर्व व्यवहार सुरळीत ठेवले असताना फक्त मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरावर उपजिविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाले आहे. त्यांना राज्य सरकार मदत देखील देत नाहीये मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातील इतर राज्यात मात्र मंदिरे सुरू आहेत म्हणूनच देव धर्मावर अन्याय करणाऱ्या देवी-देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुले करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्ण जयंती व चौथा श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सातारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मोनाली पवार, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, तालुका उपाध्यक्ष सुभाष माने, ओबीसी तालुका अध्यक्ष विक्रम पवार, विजय गाढवे सर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तेजस काकडे, माजी सरपंच खेड भीमराव लोखंडे, दत्तात्रय पोतदार, बंडा भिसे, सुधीर काकडे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!