सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात भाजपची पक्ष संघटना मजबूत असून आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष ताकदीने लढणार आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी सातारा शहरच्या प्रमुख पदाधिकारी आणि नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार यांची महत्वाची बैठक सातारा येथे पार पडली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ सुवर्णादेवी पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार,जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते सातारकरांच्या विकासाचा संकल्प या संकल्प पेटीचे उद्घाटन करण्यात आले.
सातारा नगरपालिकेत आता भाजपाच ही आशा-आकांक्षा असल्यामुळे, त्यांचे मत जाणून घेऊन सातारकरांच्या विकासाचा संकल्प जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी शहरातील नागरिकांनी शहराच्या विविध भागात ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सातारकरांच्या विकासाचा संकल्प पेटीमध्ये सातारा शहराच्या परिपूर्णतेसाठी सूचना, विकासासाठी योजना सुचवाव्यात, असे आवाहन पावसकर यांनी केले.
You must be logged in to post a comment.