सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाविकास आघाडी सरकारने सुधारित केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. तसेच विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी हा कायदा मागे घ्यावा. अन्यथा, राज्यभरात विद्यापीठ बचाव आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी दिला.
कराड येथील दत्त चौकात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, विशाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी, चौकात रांगोळी काढून निषेधाचे फलक झळकवण्यात आले. यावेळीयावेळी कराड अल्पसंख्याक शहराध्यक्ष नितीन शहा, विश्वनाथ फुटाणे, कराड दक्षिण युवा मोर्चा अध्यक्ष राहुल चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष सीमाताई घार्गे, स्वाती पिसाळ, सुदाम साळुंखे, किसन चौगुले, शैलेश गोंदकर, सुदाम साळुंखे, दीपक खापरे, सुरेश दौडमनी, संजय पवार आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.