2024 ला सातारा लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून येणार : जयकुमार गोरे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी जिल्ह्यात त्यांचे तीनच आमदार उरले आहेत, अशी टीका करून आता परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होत नाहीत, असे नाही तर त्यांना निश्चितपणे हरवले जाऊ शकते. त्यासाठी भाजपने रणनिती आखली असून आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

शासकिय विश्रामगृहात त्यांनी आज केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्ह्यात तीनच आमदार उरले आहेत. या अनुषंगानेच भाजपने रणनिती आखली असून आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार, अशी ठाम विश्वास आमदार गोरे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच संघटनात्मक बांधणी सुरू केली असून १४४ लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश येत्या रविवार (ता. 28) ते 30 जून असे तीन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते केंद्राच्या योजनांचा प्रसार प्रचाराबाबत संघटनात्मक पातळीवर चर्चा करणार आहेत. तसेच जाहीर मेळावे आणि रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद दाखवणार आहेत,

error: Content is protected !!