फलटणमध्ये रेमिडिसवरचा काळाबाजार उघड

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : करोनाचा भीषण हाहाकार पसरला असताना आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले.

ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या करोना रुग्णांवर रेमडेसिवीर या औषधाची चांगला परिणाम होत असल्याचं समोर आल्यानंतर त्याचा उपचारासाठी वापर वाढला आहे. सध्या १०० एमजीचे एक व्हायल दुप्पट व तिप्पट भावाने विकलं जात आहे. करोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती सर्रास त्या औषधाची चिट्ठी डॉक्टरांकडून दिली जात असून त्याचा गैरफायदा घेत काळाबाजार सुरू आहे. हॉस्पिटलचे काही कर्मचारी औषधांचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती

फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय हा एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे. यापुढे असा कोणी रेमिडिसवर औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!