सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग २१ व्या वर्षी गोडोली येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. गोडोली मित्र समूह, युवा मोरया सामाजिक संस्था व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्यावतीने आयोजित या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी न चुकता यंदाही रक्तदान करून तब्ब्ल ४० वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला.
पालवी चौक येथे झालेल्या या शिबिरात 29 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी शिबिराचे आयोजक रवी पवार, प्रकाश घाडगे, युवराज जाधव, पंत चव्हाण, श्रीकांत जाधव, चेतन जाधव, रवी अहिरे, अमित जगताप, दादा चव्हाण, मयूर निपाने, अमोल सुतार, संजय चव्हाण, सागर भोसले, अनिरुद्ध पवार, दाजी जाधव, राजीव मोरे, फिरोज पठाण, पोपटअण्णा मोरे, राजू मोरे, पांडुरंग पोतेकर विक्रांत देशमुख, हणमंत फडतरे, सौ मालती साळुंखे, सौ उषाताई जाधव, सौ.सुजाता घोरपडे, डॉ. देवयानी भोसले, विलासकाका कासार, चंदन घोडके, बाळासाहेब महामुलकर, ओमकार परदेशी आदी उपस्थित होते.
रक्तदानासाठी आलेल्या अनेक रक्तदात्यांना कोरोना लस घेतल्यामुळे या शिबिरात रक्तदान करता आले नाही. याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान,शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदानाचे महान कार्य पार पडणाऱ्या सर्वांचे आणि जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे रवी पवार व त्यांच्या सहकार्यांनी आभार मानले.
You must be logged in to post a comment.