जम्बो कोवीड हाॅस्पीटलच्या बाहेर बाऊंसरचा पहारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित होत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इमारतीमध्ये गेल्या वर्षीपासून जम्बो कोवीड सेंटर सुरु केले आहे. दरम्यान, मागील आठवड्यामध्ये कोवीड सेंटरच्या बाहेर हाणामारीची घटना घडल्याने प्रशासनाच्यावतीने बाऊंसरची नेमणूक केली आहे. आज तब्बल १६ बाऊंसर तैनात करण्यात आले. यावर सातारकर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोवीड सेंटरच्या बाहेर रुग्ण आणि आरोग्य प्रशासनामध्ये वादावादीची घटना घडत आहेत. मागील आठवड्यामध्ये कोवीड सेंटरच्या बाहेर दोन गटात हाणामारी झाली. यावेळी मध्यस्थी करण्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटली. या पार्श्वभूमीवर कोवीड सेंटर प्रशासनाच्यावतीने रुग्ण आणि येथे काम करणारे आरोग्य कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी बाऊंसरची नेमणूक करण्यात आली आहे, असा खुलासा प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.

error: Content is protected !!