सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मी आता आलोय. मी स्वत: लक्ष घालून येत्या दोन ते तीन वर्षात कारखान्याची गाडी रुळावर आणून शेतकर्यांच्या मालकीच्या कारखान्याला गतवैभव मिळवून देईन, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारासाठी झालेल्या या बैठकीत ते बोलत होते.
महेश शिंदे म्हणाले, सर्वत्र खासगीकरणाचा बारामतीचा फेरा पडत असून तो किसन वीर कारखान्यावर पडू नये यासाठी जागरुक रहा. आता मी आलोय. मी स्वत: या कारखान्यात लक्ष घातले असून सभासद शेतकर्यांचीच मालकी कायम ठेवून दोन वर्षातच किसन वीर अडचणीतून बाहेर काढून दाखवेन.
You must be logged in to post a comment.