सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ढवळ, ता फलटण गावात बैलगाड्या शर्यतीसाठी तयार करण्यात आलेला एक ट्रॅक फलटण ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला असून शर्यतीचा डाव उधळून लावला आहे
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये ढवळ गावात बैलगाड्या शर्यती खेळत असलेबाबत माहिती पोलिसांना मिळाल्याने आज रविवारी पोलीसानी सदर जागेवर छापा मारण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी बैल गाड्या किंवा कोणीही इसम मिळून आले नाही मात्र बैलगाड्या शर्यत खेळण्याकरिता तयार केलेला ट्रॅक दिसून आला. त्यामुळे जवळच्या परिसरातून jcb आणून संपूर्ण ट्रॅक पोलिसांनी उद्धस्त केला आहे आणि जागोजागी मोठे खड्डे पाडून त्यात जुनाट बाभळी आणि इतर काटेरी झाडे टाकली आहेत जेणे करून बैल गाड्या शर्यतीला प्रतिबंध होईल..
You must be logged in to post a comment.