सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या बैलगाडा शर्यती पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. करोनाच्या काळात त्या बंद होत्या. तब्बल चार वर्षांनंतर मंगळवारी त्या भरवण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा धुरळा उडाला. पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बैलगाडा शैर्यत पाहण्याचा नादचखुळा असल्याने तोबा गर्दी केली होती. बाजुचा डोंगर माणसांनी भरला होता.
You must be logged in to post a comment.