घरफोडीचा गुन्हा चार तासांत उघड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोनगिरवाडी, वाई येथील इनामदार अॅटो स्पेअर पार्ट दुकानाचे कुलून तोडून सत्तर हजारांचा ऐवज चोरी गेला होता. याची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या चार तासांत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दाऊद इनामदार यांचे सोनगिरवाडी येथे इनामदार अँटो स्पेअर पार्टचे दुकान आहे. या दुकानातून चोरट्यांनी कॅन, एक्सल शॉप, टॉमी, अम्वेसिटरचा गिअर बॉक्स असे सत्तर हजारांचे साहित्य चोरुन नेले होते. हे लक्षात आल्यावर इनामदार यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, ही चोरी दोघांनी केली असून त्यांनी चोरीचे साहित्य श्रीरामनगर धोम कॉलनी वाई येथे ठेवल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली. त्यानंतर पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची तपासणी केली असता त्यामध्ये इनामदार अँटो दुकानातून चोरीस गेलेले साहित्य व किराणा मालाने भरलेली दोन प्लॅस्टिकची पोती असा ८५ हजार रुपयांचा माल सापडला. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी इनामदार अॅटो व खानापूरमधील पद्मश्री कम्युनिकेशन अँड किराणा स्टोअर्स या नावाच्या दुकानातही चोरी केल्याची कबुली दिली.

error: Content is protected !!