सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : हातात तलवारी घेऊन दहशत माजवून पाचजणांच्या टोळक्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास भरवस्तीतील सणगर गल्लीतील, एका विद्यमान नगरसेवकासह इतर पाच नागरिकांची घरे फोडली, तर मुख्य बाजारपेठ, माळी गल्ली, शिक्षक कॉलनी सुतार गल्ली आदी परिसरातील सुमारे दहा बंद घरांची कुलपे तोडून मोबाईल रोख रकमेचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले.
म्हसवड पोलीस ठाण्यात सणगर गल्लीतील विद्यमान नगरसेवक केशव कारंडे हे परगावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याच गल्लीतील सुमन बलभीम सासणे हेही परगावी गेल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० ग्राम सोन्याची फुले, जुबे, साखळी, आठ ग्राम सोन्याची बोरमाळ सोन्याची नथ असा ऐवज चोरून नेला. कैलास चौधरी यांच्याही घरातून सहा हजार रुपये चोरट्यांनी लांबविले. महादेव कारंडे, राजू गोंजारी, मानसी सासणे यांच्या घरातूनही चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मुख्य बाजार पेठेतील शहरात दहा ते १२ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप दोनच जणांनीच याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
You must be logged in to post a comment.