म्हसवड परिसरात एसटी बस जळून खाक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा – पंढरपुर रस्त्यावर म्हसवड परिसरात धुळदेव येथे आज दुपारी साडेबारा वाजता आगीच्या ज्वालांनी वेढलेल्या बर्निंग एसटी चा थरार एसटी चालकाच्या प्रसंग अवधामुळे ४४ प्रवाशांचे प्राण वाचले व कोणतीही जीवित हानी नाही. मात्र संबंधित संपुर्ण एसटी बस जळून खाक होऊन फक्त सांगाडा शिल्लक राहिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा आगाराची एम एच ११ बी एल ९३ ५५ एसटी बस सोलापूरला जात असताना म्हसवड पासून पूर्वेस सुमारे सात किलोमीटर अंतरावरील धुळदेव या गावाच्या बस थांबाच्याच्या ठिकाणी एक वयोवृध्द त्यांच्या एसटीतून उतरत असताना इंजिन मधून धूर येत असल्याचे चालक शंकर पवार त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून बस मध्ये प्रवासास बसलेल्या ४४ प्रवाश्यांना वाहक सुधीर जाधव यांना तात्काळ खाली उतरवण्या सांगितले.त्यानंतर एसटी चालक जाधव यांनी सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवल्यानंतर पाच दहा मिनिटातच आगीने रुद्र रूप धारण केले व संपूर्ण बसने पेट घेतला.

error: Content is protected !!