आरळे येथे इलेक्ट्रिक बाइक जळून खाक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा लोणंद रस्त्यावर आरळे ता. सातारा येथील कदम पेट्रोल पंपा नजीक चालत्या इलेक्ट्रिक बाइक मध्ये झालेल्या शॉक सर्किट मुळे बाईक ने अचानक पेट घेतल्याने बाईक पूर्णपणे जळून खाक झाली असून यात कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत माहिती अशी की जयवंत आनंदराव साबळे रा. शिवथर ता. सातारा यांची तुनवाल या कंपनीची इलेक्ट्रिक बाइक असून या बाईकला चार वर्षे पूर्ण झाली आहेत सदर बाईक घेऊन त्यांचा मुलगा ओम साबळे हा सातारा ला जात होता दुपारी 2 वाजता आरळे नजीक असलेल्या कदम पेट्रोलियम पंपा जवळ आल्यानंतर बाईक मधून अचानक धूर येऊ लागल्याचे लक्षात आले यावेळी बाईक रस्त्याच्या बाजूला घेईपर्यंत बाईकने अचानक पेट घेतला होता यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बाईकला लागलेली आग विझविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की बघताक्षणी ही इलेक्ट्रिक बाइक पूर्णपणे जळून खाक झाली या आगीत कोणीही जखमी झाले नसून परंतु बाईक पूर्णपणे जळून खाक झाली असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात येत होते.

error: Content is protected !!