महामार्गावर ट्रकला आग

महामार्गावरील धनगरवाडी परिसरात मालट्रकला लागलेली आग अग्निशामक दलाने विझविली

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) – पुणे-बेंगलोर महामार्गवरील धनगरवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये इचलकरंजीहून अहमदाबाद, गुजरातकडे कापूस भरुन निघालेल्या मालट्रकला अचानक आग लागली. दरम्यान शिरवळ पोलीस आणि खासगी कंपनीच्या अग्निशामक दलाच्या मोठ्या हानी टळली.

याबाबतची माहिती अशी की, इचलकरंजीहून अहमदाबाद (गुजरात) कडे कापूस भरुन निघालेल्या मालट्रक (क्रं.एचआर-38- डब्ल्यू-7167) हा धनगरवाडी गावच्या हद्दीत आला असता एका ढाब्यासमोर चालकाने संबंधित मालट्रक लावला. यावेळी काहीवेळानंतर संबंधित मालट्रकच्या पाठीमागील बाजूकडून धूर येत असल्याचे ढाब्यावरील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. यावेळी याबाबतची कल्पना शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच तत्काळ धाव घेते शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस हवालदार विलास इंगवले, विनोद पवार, नवनाथ कोळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया इंगवले, होमगार्ड जाधव यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तत्परता दाखवत मालट्रकमधील कापसाचे गठ्ठे बाहेर काढत मोठ्या प्रमाणात होणारी हानी टळली. यावेळी शिरवळ एमआयडीसीमधील एशियन पेंटस व गोदरेज लाँकीम कंपनीच्या अग्निशमन बंबांच्या सहकार्याने मालट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी मालट्रकचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

error: Content is protected !!