सातारा लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार; कठोर नियम लागू

आज संध्याकाळी ६ वाजता प्रचार बंद करून आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी ७ तारखेला मतदान होणार आहे.निवडणूक आयोगाने ४८ तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि.५ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे बंद करावा,असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.

प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणास प्रतिबंध असेल,असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई होऊ शकते त्यामुळे आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन डूडी यांनी केलं आहे.

दरम्यान,प्रिंट मिडीयामधून मतदानपूर्व दिवस व मतदान दिवस या दोन्ही दिवशी देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिराती एमसीएमसी समितीचे पूर्व प्रमाणिकरण असल्याशिवाय प्रसिद्धीस देवू नये, असे निर्देशही जिल्हा निवडणूक अधिकारी डूडी यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!