सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :येणके (ता. कऱ्हाड) येथील ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथंच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली होती. या घटनेमुळं त्या परिसरात असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं शिवारात पिंजरा लावला होता, त्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं .
ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाला बिबट्यानं ठार केल्याची घटना आठवड्यापूर्वी येणके (ता. कऱ्हाड) या गावात घडली होती. बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या सापडला नव्हता. त्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली वावरत होते. शुक्रवारी रात्री सापळ्यात लावलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला आणि बिबट्या अलगदपणे सापळ्यात अडकला.
त्यामुळं तिथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आज शनिवारी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. मात्र, या बिबट्याला वन विभागानं ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
You must be logged in to post a comment.