सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे- बेंगलोर महामार्गावर बुधवार दि.3 रोजी सायंकाळी ५ वाजण्या दरम्यान सुरुर गावानजीक कार अपघातात दोन महिला ठार तर तीनजण जखमी झाले.
महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारी नेक्सन कार (एमएच ०२ ईयु६२७६) या कार चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. त्यांतील सर्वजण गंभीरपणे जखमी झाले होते. सुरुर ग्रामस्थांनी मदतकार्य देत सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे पाठवले. दरम्यान, यातील दोन महिला उपचारादरम्यान मृत झाल्याचे सांगण्यात आले रागिणी जयवंत खैरनार (वय 47 रा. बंगलोर) उर्मिला दिवाकर गांगुर्डे (वय 81रा. वसई) या दोघी मृत झाल्या. असून शैलेंद्र गांगुर्डे, सोहम गांगुर्डे, निल खैरनार हे तिघेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला या बाबत भुईंज पोलीस रात्री उशिरापर्यंत पंचनामा व तपास करीत होते घटनास्थळी बघ्यांचे मते डिव्हाडरला कार वेगात धडकल्याचे सांगतात अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय रत्नदीप भांडारे हवालदार अवघडे हवालदार मुंगसे करीत आहेत.
You must be logged in to post a comment.