सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना गोटे, ता. कराड हद्दीत बुधवारी सकाळी १ १ वाजण्याच्या सुमारास चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. योगेश अशोक बारटक्के ( वय ३५), भारती अशोक बारटक्के (वय ५५ ), निरज योगेश बारटक्के (वय ५ सर्व रा. मंगळवार पेठ सातारा) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, ट्रँक्टर (क्रमांक एम एच ११ यु ०८२३ ) हा ट्रॉली क्रमांक ( एम एच ११ आर ९६५३ व ९६५४) घेऊन कराडकडे जात होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत आले असता, सातारा येथून कोल्हापूर दिशेने जात असलेल्या कार ( क्रमांक एम एच १२ ई टी ३४३७) च्या चालकाचा ट्रँक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटल्याने कारची ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प होती. कराड पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
You must be logged in to post a comment.