भुयाचीवाडी कार अपघातात दोन ठार, चार जखमी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  साताराहून कऱ्हाडच्या दिशेनं निघालेल्या एका चारचाकी कारने भुयाचीवाडी, ता. कराड येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याची घटना घडली. या अपघातात दोन महिला ठार झाल्या असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

या अपघाताची माहिती समजताच, उंब्रज पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. भुयाचीवाडी येथे राजपुरोहित ढाब्यासमोर हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. हा अपघात घडला, त्यावेळी कऱ्हाडला जाणाऱ्या वाहनधारकांनी त्यांची वाहने थांबवून अपघातग्रस्तांना मदत केल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली. अपघातग्रस्त वाहन हे मुंबई-कल्याण येथील असून अधिक तपास उंब्रज पोलिस करत आहेत.


error: Content is protected !!