सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील पोलीस करमणूक केंद्रासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला.
नागेश शंकर भिवटे (वय ३५, रा. मल्हार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नागेश भिवटे हा पोलीस मुख्यालयाशेजारील एका हाॅटेलमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो पोलीस करमणूक केंद्रासमोरील रस्ता आलोंडत असताना राजवाड्याहून भरधाव आलेल्या कारने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, शंकरचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनीही घटनासस्थळी धाव घेतली
You must be logged in to post a comment.