सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडनंतर होणाऱ्या मागील 19 वर्ष अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील लोकांना समजावणारा गुलमोहर ‘डे’ आज साताऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साताऱ्यातील आबालवृद्धांनी या उत्सवाला आवर्जून हजेरी लावली.
पर्यावरण विषयक उपक्रम, जनजागृती तसेच ललित कला, साहित्य, संगीत नृत्य अशा अविष्काराच्या माध्यमातून निसर्ग आणि कला याचा अनुबंध गुलमोहोर ‘डे’ दिवशी अधोरेखित केला जातो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कलाकार,रसीक व पर्यावरण प्रेमी यांनी आजच्या गुलमोहोर ‘डे’ मध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रात हा गुलमोहर ‘डे’ साजरा करण्यात आला. सकाळी चित्रकला, मांडण शिल्प, चित्रकारांची प्रात्यक्षिके ज्येष्ठ कलावंतांचे मार्गदर्शन तर संध्याकाळच्या सत्रात काव्यवाचन करण्यात येणार आले.
गेली 19 वर्ष साताऱ्यातील पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ कलावंतांच्या पुढाकाराने हा गुलमोहर ‘डे’ दरवर्षी १ मे ला साजरा केला जातो. आज सुद्धा सातारा दूध संघासमोर असलेल्या मोठमोठ्या गुलमोहराच्या झाडाखाली गुलमोहर ‘डे’ चे आयोजन करण्यात आले होते. गुलमोहराच्या झाडाखाली ठीक ठिकाणी चित्रकला, मांडण शिल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच शालेय विद्यार्थी गुलमोहराच्या झाडाखाली बसून गुलमोहराचे चित्र रेखाटत होते.
साताऱ्यातील अनेक मान्यवरांनी याठिकाणी आवर्जून सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात आबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. रखरखत्या उन्हात गुलमोहर, बहावा, शिरीष या झाडांच्या फुलांची रंगाची उधळण सजग मनांनी टिपावी निसर्गाच्या रंगोत्सवात रंगून जाताना पर्यावरण भान निर्माण व्हावे, हा उद्देश जपला जावा यासाठी दरवर्षी साताऱ्यात गुलमोहर ‘डे’ साजरा केला जातो.
You must be logged in to post a comment.