सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी कुलदैवत शिरकाई देवीच्या मंदिरासाठी दिवा अर्पण केला. तसेच देवीच्या मंदिरावर लोकसहभागातून मंडप उभारणार असल्याचा मानस ही व्यक्त केला.
सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कुलदैवत असलेल्या शिरकाई देवीला दिवा अर्पण करुन कायम स्वरुपी देवीच्या मंदिरात दिवा तेवत राहण्यासाठी दर महिन्याला पुजारीला देणगी देणार असल्याचे सांगितले. यावेळी देवीची खणा-नारळाने ओटीही भरण्यात आली.तसेच गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजा करण्याचा मान ही राजेशिर्के यांना मिळाला.
दरवर्षी तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो. संपुर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन छत्रपतींचे मावळे हा दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गडावर उपस्थित असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना गडावर पुजा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
शिवराज्याभिषेक सोहळ्यास आमदार भरत गोगावले, माजी आमदार मनोहर भोईर, पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, युवा सेना अध्यक्ष विकास गोगावले, शिवराज्यभिषेक उत्सव समिती अध्यक्ष सुनिल पवार, उपाध्यक्ष सनी ताटेळे, नितीन पावळे व शिवप्रेमी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.