सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेली चार वर्षे बंद असलेल्या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर सशर्त परवानगी दिली आहे. या निकालामुळे या जत्रा हंगामापासूनच ग्रामीण भागात पुन्हा धुरळा उडणार आहे. झाली रे आणि हुर्र.. अशी आरोळी घाटात घुमणार आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्रालाही पुन्हा चालना मिळणार आहे. या निकालानंतर बैलगाडी शौकीनानी राज्यभर सेलिब्रेशन केलं.
ही शर्यत पुन्हा सुरु व्हावी, यासाठी पाठपुरावा करणारे व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी दिल्ली येथे गेले काही दिवस ठाण मांडून बसलेले भोसरीचे बैलगाडा शर्यतप्रेमी पैलवान आमदार महेश लांडगे, बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष विलास देशमुख व सहकाऱ्यांनी दंड ठोपटून विजयी झाल्याची प्रतिक्रिया या निकालावर दिली आहे. तसेच गावोगावी बैलगाडा शौकिनांनी गुलाल उधळून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून सेलिब्रेशन केलं.
You must be logged in to post a comment.