केंद्राच्या रोड फंडामधुन 20 कोटींचा भरघोस निधी मंजूर : उदयनराजे

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : केंद्राच्या सेन्ट्रल रोड फंड (सीआरएफ) मधुन सातारा शहरातील वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या कामासाठी आणि कराड-पाटण तालुक्यातील डिचोली-नवजा,हेळवाक,मोरगिरी,गारवडे साजुर-तांबवे-विंग-वाठार-रेठरे-शेणेाली स्टेशन अखेर राज्यमहामार्ग क्रमांक 148 वरील कि.मी.69 ते कि.मी.73 या टप्यातील कामासाठी रुपये 4 कोटी 91 लाख असा एकूण सुमारे 20 कोटींचा भरघोस निधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे अशी माहीती जलमंदिर पॅलेस येथुन प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

जास्तीत जास्त निधी शासनाकडून प्राप्त करुन, सातारा जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाकरीता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच सातत्याने प्रयत्न करीत असतात. रस्ते मजबुत असतील तर दळणवळण सोयीचे होतेच तथापि सुरक्षित दळणवळणाची सुविधा निर्माण होते म्हणून, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेन्ट्रल रोड फंड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम, जिल्हापरिषद बांधकाम विभाग, आदींच्या माध्यमातुन खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हयातील आणि शहरातील रस्त्यांच्या दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी जास्तीत जास्त तरतुद मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

कराड-पाटण तालुक्यातील डिचोली ते शेणोली रेल्वे स्टेशन या राज्य महामार्ग क्रमांक 148 च्या कि.मी. 69 ते कि.मी.73 अखेरच्या रस्ता मजबुतीकरणाचे कामासाठीही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी क-हाड नगरीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या समवेत प्रस्तावित केले होते. तसेच सातारा शहराचा अगनेय पूर्वेकडील होणार विस्तार आणि सातारा शहराची झालेली हद्दवाढ विचारात घेवून, राज्यमहामार्ग क्रमांक 117 चा काही भाग असलेल्या वाढे फाटा ते पोवईनाका या सातारा शहरातील रस्त्याची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते.
त्यानुसार केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या अखत्यारित येणा-या सेन्ट्रल रोड फंड मधुन या दोन्ही कामांसाठी एकूण सुमारे रुपये 20 कोटी इतका भरघोस निधी केंद्र सरकारच्या माध्यमातुन मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या कामामुळे फार मोठी सुविधा ग्रामस्थ-नागरीकांना होणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

error: Content is protected !!