सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) कराडच्या चारुदत्त साळुंखे यांची भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधकम्हणून निवड झाली आहे. त्यांची अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून निवड करण्यात आली आहे. त्यांनी सबंध देशातून 48 वा क्रमांक मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले
चारुदत्त साळुंखे मूळचे चाफळ (ता.पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागाचे रहिवासी आहेत. त्यांनी आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथे झाले. दहावीला ते 94.55 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले
चारुदत्त साळुंखे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अॅटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. CoEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असतानादेखील त्यांनी खाजगी क्षेत्रात जॉब न करता शासकीय सेवांत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून 48 वा क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला.
या यशाच्या जोरावरच साळुंखे यांची सबंध देशाच्या टेक्नीकल क्षेत्राला दिशा देणाऱ्या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली. तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अनुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात. तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखतीमधून चारुदत्त साळुंखे यांची संशोधक म्हणून निवड होऊन ते यशस्वी झाले.
You must be logged in to post a comment.