सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रविवार पेठेतील पाण्याची गळती काढावी तसेच पथदिवे बसविण्यात यावेत, या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेना आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कामे मार्गी लावावेत अशी मागणी केली आहे.
छावा क्रांतिवीर सेना जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरातील प्रभाग सहा मधील कामगार कल्याणच्या कार्यालयासमोर एअर व्हॉल्व नादुरुस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. तरी हा व्हॉल्व लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा. जुनी पिठाची गिरणी ते सातारा सर्व्हिसिंग समोरून जाणारी पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटली आहे. ती दुरुस्त करावी. तसेच सर्वोदय कॉलनी परिसरातील पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
You must be logged in to post a comment.