सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. तसेच प्रशासनात काम करणाऱ्या शिक्षकांचा गटशिक्षण अधिकारी विनयभंग करतो. गृहराज्यमंत्र्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टिका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
जावली व माण तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या पिडीतांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यानंतर त्या साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी शहरध्यक्ष विकासजी गोसावी, राहूल शिवनामे, निलेशजी शहा, चंदन घोडके, विक्रांत भोसले, प्रविण शहाणे उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या. राज्यात दररोज महिलांवरील आत्याचाराच्या घटना वाढत आहे. राज्य सरकार गुन्हे दाखल करण्यास तसेच संशयित आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे. अशा प्रकारे राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून राज्यातील गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम केले जात आहे. सरकारमधील मंत्रीत सुरक्षित नसतील तर महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा अधिकारी नाही. याप्रकरणी आम्ही गृह राज्यमंत्र्यांना कमांडोचे संरक्षण द्यावे, अशी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.
सातारा जिल्ह्यातील शिक्षिकाचा गटशिक्षण अधिकारी विनयभंग करीत आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार असून या प्रकरणी संबंधित शिक्षिकेला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.
You must be logged in to post a comment.